मुंबई – दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या ड्रेसिंग सेन्सचीही खूप चर्चा आहे. आता दीपिका पदुकोण तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोल होत असल्याचं दिसून येत आहे. लेदर जॅकेट घालून एअरपोर्टवर पोहोचलेली दीपिका आता ट्रोल होत आहे. मार्चच्या उन्हात तिचा हा लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले.
नुकतंच दीपिका विमानतळावर स्लीक लेदर जॅकेट आणि पोलो नेक टी-शर्टमध्ये दिसली. जे तिने बॅगी डेनिम आणि बूट्ससह पेअर केले. ती नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत होती. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहेत. मात्र, विमानतळावर दीपिकाला लेदर जॅकेटमध्ये पाहिल्यानंतर नेटिझन्सनी दीपिका पदुकोणला ट्रोल केले.
View this post on Instagram
मुंबईत उन्हाचा पारा चढत असतानाच मार्चच्या उन्हात दीपिकाच्या लेदर जॅकेटमध्ये ट्रोलर्सनी खिल्ली उडवली. तिचा हा व्हिडिओ पाहून एका यूजरने लिहिले की, ‘उन्हाळ्यात लेदर जॅकेट कोण घालते?’ दुसर्याने लिहिले, ‘उन्हाळ्यात लेदर जॅकेट आणि बूट’ तर दुसर्याने लिहिले, ‘मुंबईत थंडी आहे का?’ इत्यादी अनेक कमेंट नेटकरी करताना दिसत आहे.
दरम्यान, दीपिका पदुकोणच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री अलीकडेच अभिनेता शाहरुख खान सोबत ‘पठाण’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा केल्यानंतर आता दीपिका तिच्या पुढील प्रोजेक्ट ‘फायटर’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.