मुंबई – बॉलीवूडची फॅशन क्वीन उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाते.गेल्या काही दिवसांपासून उर्फी एकामागून एक फॅशन इव्हेंटमध्ये हजेरी लावत आहे. नुकतेच प्रसिद्ध डिझायनर अबू जानी-संदीप खोसला यांच्या पार्टीत ती दिसून आली.यावेळेसचा तिचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
उर्फीचा या पार्टीतील लूक तर चर्चेत होताच त्यासोबत उर्फी अभिनेता अर्जुन कपूरसोबत दिसल्याने देखील चर्चेत आली. या कार्यक्रमात अर्जुन देखील हजर होता.समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अर्जुन कपूर उर्फी सोबत गप्पा मारताना दिसत आहे. याशिवाय दोघांनी मिळून मीडिया फोटोजसाठी पोज देखील दिल्याचे पाहायला मिळत आहे.
अभिनेत्रीच्या लुकबद्दल बोलायचे तर तिने सिल्व्हर कलरच्या ब्रॅलेटसह मॅचिंग स्कर्ट घातला होता. तिने केसांना स्लीक लुक दिला आणि कपाळावर झिगझॅग आकारात रेषा डिझाईन देखील केली होती. या संपूर्ण लुकमध्ये तिने सिल्व्हर कलरच्या हाय हील्स सँडल कॅरी केल्या होत्या.उर्फी आणि अर्जुनच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी तुफान कमेंटबाजी केली आहे. ‘मलायका मारेल…’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर दुसऱ्या एकाने सिनेमात सोबत दिसू नका अशी कमेंट केली आहे.
View this post on Instagram
उर्फी आणि अर्जुन या दोघांनीही गौरव गुप्ता फॅशन स्टोअर लॉंचच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या दोघांसह कार्यक्रमासाठी मंदिरा बेदी, उर्फी जावेद आणि इतर अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. उर्फीला बऱ्याच दिवसांनी बड्या स्टारसोबत पाहून तिचे फॅन्स मात्र खुश झाले.