– राजेंद्र वाघमारे
नेवासा – नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विजय करे यांनी कायदा व सुव्यवस्था अबधित ठेवण्याचे काम करुन कुकाणा (ता. नेवासा) येथील न्यामत शहावली बाबांच्या जंगी ऊरुसामध्ये जातीय सलोखा राखत याञा उत्सव काळात अवैद्ध धंद्यांना थारा न देता याञा उत्सव शांतेत पार पाडून याञेकरु महिला – पुरुष – युवक – युवतींसह बालगोपाळांनी याञोत्सव शांततेत पार पडल्यामुळे मनमुराद आनंद लुटला तसेच,
पोलीस दप्तरी नेवासा शहराची नोंद संवेदनशिल शहर म्हणून असलेल्या शहरातील मोहिनीराज महाराजांचा याञोत्सवही शांतेत पार पाडण्याची किमया पोलीस निरिक्षक विजय करे यांनी साध्य करुन दाखवल्यामुळे पोलीस निरिक्षक करे यांच्या कर्तबगारीचे कौतुक करुन हिंदू – मुस्लीम समाजाकडून सन्मान केला जात असतांना दुसरीकडे याञोत्सव काळात अवैद्ध धंद्यांना थारा न दिल्यामुळे पडद्या – आडून अवैद्ध धंदे चालकांचे पाठिराखे सोशल मीडियातून बदनामीचे काहूर पेटवून रान उठविण्याचा प्रयत्न करत आहेत.
एकीकडे संवेदनशिल नगरीत पो.नि.विजय करे यांनी याञोत्सव शांततेत पार पाडल्यामुळे संतमहंतांसह हिंदु – मुस्लीम समाजाकडून करेंचा सत्कार केला जात आहे तर दुसरीकडे याञोत्सव काळात अवैद्ध धंद्यांना पोलीसांनी थारा दिला नाही म्हणून अवैद्ध धंदे करणाऱ्यांच्या दलालांनी ना’राज’ होवून सोशल मीडियातून खोटे रान पेटविण्याचा उद्योग सुरु केला जात आहे.
नेवासा शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबधित ठेवून नेवासकरांना आश्चर्याचा सुखदधक्का दिला जात असतांना अवैद्ध धंदे चालकांच्या हस्तकांनी याञोत्सव काळात पोलीसांनी थाराच लागू न दिल्यामुळे बदनामीचे खोटे काहूर पसरवून पोलीसांची प्रतिमा मलिन करण्याचा डाव आखण्याचा खटाटोप काही विघ्नसंतोषीं लोकांकडून सुरु झालेला याकडे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी लक्ष घालून चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा एकीकडे सत्कार होत असतांना दुसरीकडे बदनामी करणाऱ्यांना खाकीचा हिसका दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे.
नेवासा शहरासह कुकाण्यात याञोत्सव शांततेत पार पाडल्यामुळे पोलीस निरिक्षकांना जनता धन्यवाद देत आहे तर दुसरीरडे अवैद्ध धंदे करणारांचे दलाल सोशल वॉर करुन पोलीसांची बदनामी करु पहात असून पोलीसांची बदनामी करण्यांना खाकीचा हिसका दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे.