मुंबई – ”वेलकम’ हा अक्षय कुमार, कतरिना कैफ स्टारर बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट कॉमेडी चित्रपटांपैकी एक आहे.अक्षय आणि कतरिनासह नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांच्याही या चित्रपटात महत्वाच्या भूमिका होत्या. 2007 च्या वेलकमनंतर 2015 मध्ये आलेला वेलकम बँक हा या चित्रपटाचा सिक्वेल देखील प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.म्हणूनच आता लवकरच वेलकम 3 देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र तिसऱ्या पार्टमधे निर्मात्यांनी मोठा बदल केल्याचे वृत्त समोर आले आहे.
सध्या बॉलीवूडमध्ये ‘वेलकम 3’बद्दल गॉसिप सुरू आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या कलाकारांबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.ज्याबाबत सर्वांकडूनच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि संजय दत्त ‘वेलकम 3’ मध्ये एकत्र येत आहेत.
‘वेलकम’च्या तिसऱ्या भागाला आधी ‘वेलकम टू द जंगल’ असे म्हटले जात होते, पण आता या चित्रपटाचे नाव ‘वेलकम 3’ असणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती फिरोज नाडियादवाला करणार आहे.यामुळे चित्रपटात पुन्हा एकदा अक्षयची एंट्री होणार आहे.
अक्षय कुमार ‘वेलकम 2’मधून गायब होता. या चित्रपटात अनिल कपूर, नाना पाटेकर, परेश रावल तसेच श्रुती हसन, जॉन अब्राहम, शायनी आहुजा आणि नसीरुद्दीन शाह यांच्या प्रमुख भूमिका होत्या.मात्र आता तिसऱ्या भागासाठी पुन्हा एकदा अक्षयची एंट्री होणार असल्याचं बोललं जात आहे. यासोबतच संजय दत्त आणि अर्शद वारसी देखील या चित्रपटात झळकणार असल्याच्या चर्चा आहेत.