नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार भारतीय बाजारात सोमवारी सोने आणि चांदीच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीज ज्या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली सराफात सोन्याचा दर 50 रुपयांनी वाढून 56,307 रुपये प्रति 10 गॅम झाला.
तयार चांदीचा दर 140 रुपयांनी वाढून 65,770 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,845डॉलर व चांदीचा दर 21.82 या पातळीवर गेला होता.
अमेरिकेच्या पत धोरण समितीच्या बैठकीचे इतिवृत्त जाहीर होणार आहे.त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असल्याचे रिलायन्स सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक श्रीराम अय्यर यांनी सांगितले. या इतिवृत्तानंतर सोने आणि चांदीच्या बाजाराला काही प्रमाणात नवी दिशा मिळू शकेल असे ते म्हणाले.