मुंबई – ‘देवमाणूस’, ‘तुझ्यात जीव रंगला’ या टीव्ही मालिका आणि सोशल मिडियावरील आपल्या व्हिडिओ मुळे चर्चेत असणारी अभिनेत्री, नृत्यांगना ‘माधुरी पवार’ हिने आपल्या अदाकारीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. तसेच, लोकप्रिय ‘रानबाजार’ वेबसिरीज मधील राजकारणातील एक महत्वकांशी आणि करारी ‘प्रेरणा सायाजीराव पाटील साने’ ची भूमिका माधुरी पवारने जबदस्त पणे साकारली होती. तिच्या या व्यक्तिरेखेला प्रेक्षक आणि सिनेरसिकांनी भरभरून दाद दिली होती.
दरम्यान, लवकरच सर्वांची लाडकी माधुरी पवार प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी ‘वेडात वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटतात महत्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.
‘महाराष्ट्राची महाअप्सरा’ अशी ओळख असलेल्या माधुरी पवार हिने आपल्या अदाकारीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. सोशल मीडियावर देखील माधुरीचा मोठा चाहता वर्ग असून, इंस्टाग्रामवर माधुरीचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.
दरम्यान, ‘वेडात वीर दौडले सात’ हा एक ऐतिहासिक चित्रपट असून मराठी आणि हिंदीसह पाच भाषांमध्ये या चित्रपटाची निर्मिती होत आहे. माधुरी पवार नेमकी कोणती व्यक्तिरेखा साकारणार आहे? हे जाणून घेण्यासाठी मात्र आपल्याला काही काळ वाट बघावी लागणार आहे.
तर, दुसरीकडे या चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा छत्रपती शिवरायांच्या भूमिकेतील फर्स्ट लूक देखील प्रदर्शित करण्यात आला होता.