मुंबई – अनेकदा आपल्या आवडत्या स्टार्सना समोर पाहून चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. अनेक वेळा लोक आनंदात आपला संयम गमावतात आणि असे काही करतात की स्टार्सला देखील या वेळेला कजय करावे ते समजत नाही. असाच एक किस्सा अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत देखील नुकताच घडला.
आदित्य रॉय कपूरच्या आगामी शो ‘द नाईट मॅनेजर’च्या स्क्रीनिंगदरम्यान एका महिला चाहत्याने अभिनेत्याला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आदित्यने कशीबशी वेळ निभावून नेली.मात्र या प्रसंगाचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे.
व्हिडिओमध्ये एक महिला आदित्यसोबत सेल्फी घेण्यासाठी आल्याचे दिसून येते. तिने सेल्फी क्लिक केला, त्यानंतर ती आदित्य रॉय कपूरच्या गालावर जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न करते. आदित्य रॉय कपूर तिला नकार देतो आणि बाजूला सरकतो. महिला पुन्हा जवळ येते आणि आदित्यला किस करण्याचा पुन्हा प्रयत्न करते यावेळी मात्र अभिनेता त्या महिलेपासून दूर जातो. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर जोरदार कमेंटबाजी केली आहे.
View this post on Instagram
आदित्य रॉय कपूर ‘द नाईट मॅनेजर’ द्वारे वेब दुनियेत पदार्पण करत आहे. या शोमध्ये तो अनिल कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. शोमध्ये शोभिता धुलिपाला, तिलोत्तमा शोम, सास्वत चॅटर्जी आणि रवी बहल यांच्याही भूमिका आहेत. संदीप मोदी दिग्दर्शित द नाईट मॅनेजर 17 फेब्रुवारीपासून हॉटस्टारवर प्रसारित होईल.