इस्लामाबाद – पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थितीमुळे तेथिल परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. खाद्यपदार्थांच्या किमती वाढवल्यानंतर पाकिस्तान सरकारने आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ केली आहे. पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 35 रुपयांनी वाढ केल्याने संतप्त झालेल्या लोकांनी लाहोरमधील पेट्रोल पंपाला आग लावली. हा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पाकिस्तानातील लोक आधीच पूर आणि अन्नधान्याच्या किमतीमुळे हैराण झाले होते, मात्र आता आणखी एक समस्या लोकांवर आली आहे. पाकिस्तानची अवस्था इतकी वाईट झाली आहे की आता ते सहन करण्याची ताकद लोकांमध्ये उरलेली नाही. पाकिस्तानच्या ट्विटर युजर पाक मुजाहिदीनने व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, ‘पेट्रोलचे दर 35 रुपयांनी वाढल्यानंतर लोकांनी लाहोरमधील पेट्रोल पंपाला आग लावली. पाकिस्तानी जनता प्रचंड संतापली आहे.
Lahore #Petrol pump set on fire after increase of rs 35 in petrol. People of #Pakistan are very angry. #PakistanEconomy #PetrolDieselPrice #Petrolprice pic.twitter.com/89j0Fxb9Kd
— Pak Mujahideen 🇵🇰 (@pakmujaheed) January 30, 2023
पाकिस्तानात महापुरानंतर वाढत्या महागाईमुळे हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे, लोकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे कठीण झाले आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती पाहून लोक त्याला दुसरा श्रीलंका म्हणू लागले आहेत. श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती खराब झाल्यानंतर तेथील जनता महागाईमुळे रस्त्यावर आली आणि राष्ट्रपती भवनातही घुसले. पाकिस्तानच्या बिघडलेल्या परिस्थितीमध्ये राजकारणी आपापसात भांडत आहेत, त्याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.