मुंबई – के एल राहुल आणि अथिया शेट्टी हे लग्नानंतर आपल्या जीवनात व्यस्त झाले आहेत. असं असलं तरी सोशल मीडियावर मात्र त्यांच्याबाबतची चर्चा काही केल्या थांबताना दिसत नाही. गेल्या महिन्यांपासून क्रिकेटर के एल राहुल आणि अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी यांच्या विवाहाची चर्चा होती अखेर तो विवाह संपन्न देखील झाला. मात्र असलं तरी अथियाची चर्चा मात्र अजूनही सोशल मीडियावर सुरु आहे. यावेळी चर्चेचं निमित्त काहीस वेगळं आहे.
लग्नानंतर नव वधू असलेली अधिया पहिल्यांदाच एका ठिकाणी दिसून आली. अथियाचा यावेळेसचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यावरून नेटकरी तिला चांगलच ट्रोल करताहेत. लग्नानंतर पहिल्यांदा अथिया मुंबईतील एका पार्लरमधून बाहेर येताना दिसली. या वेळेसच तिचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.मीडिया कर्मींनी तिला नव आयुष्यासाठी शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला मात्र तिने कोणालाही प्रतिसाद न देता गाडीतून निघून जाणे पसंत केले.
अथिया यावेळी कॅज्युअल व्हाईट ड्रेमध्ये दिसून आली. एका दुकानातून बाहेर पडत थेट गाडात बसून निघून गेली. नवी नवरी असूनही अथियाच्या गळ्यात ना मंगळसूत्र दिसले ना कपाळावर टिकली आणि याच मुद्द्यावरून अनेकांनी अथियाला ट्रोल करायला सुरुवात केली. अनेकांनी तिला कमेंट करत याबाबत जाब देखील विचारला असल्याचे दिसून येते. एका युजरने सासूबाई ओरडत नाही का ? असा सवाल विचारला आहे तर दुसऱ्याने संस्कृती विसरली वाटत अशी कमेंट केली आहे. तर काहींनी अथियाच्या या कृतीमध्ये काहीही वावगं नसल्याचे देखील म्हंटले आहे.
View this post on Instagram
सुनिल शेट्टी यांच्या खंडाळा येथील बंगल्यावर निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला क्रीडा आणि चित्रपट जगतातील अनेक दिग्गजांनीही हजेरी लावली.विवाह सोहळ्याचे काही फोटो केएल राहुलने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर शेअर केले होते.राहुल आणि अथिया यांच्या लग्नानंतर अथियाचा भाऊ अहान शेट्टी आणि वडील सुनील शेट्टी यांनी पत्रकारांमध्ये मिठाई वाटली. त्याचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.