मुंबई – राखी सावंतची आई जया सावंत यांचे निधन झाले आहे. राखीची आई जया सावंत गेल्या अनेक दिवसांपासून टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या. कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमरशी त्या झुंज देत होत्या. अखेर त्यांची आज उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. अनेक दिवसांपासून राखी सावंत तिच्या आईला रुग्णालयात भेटायला जाताना दिसत होती. तिच्या आईच्या प्रकृतीसाठी चाहते सतत प्रार्थना करत होते.
मात्र काल राखीच्या आईने अखेरचा श्वास घेतला. यानंतर राखी सावंतला फार दुःख झाले. राखी आईसोबत शेवटच्या क्षणापर्यंत होती. आता राखीच्या आईचा निधनापूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये राखीची आई रुग्णालयातील बेडवर झोपलेल्या दिसत आहेत. त्यांच्या शेजारी रखी रडताना दिसत आहे.
स्वतः राखीने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये ती लिहिते, ‘माझ्या आईचा हात आज माझ्या डोक्यावरुन हरवला आहे. आता माझ्यासाठी गमावण्यासारखं काहीही नाही. आय लव्ह यू आई… तुझ्या शिवाय आता काहीही नाही. आता माझी हाक कोण ऐकेल. मला मिठी कोण मारेल… आता मी काय करु…’ असं लिहिलं आहे.