शरवानंद आणि रक्षिता रेड्डी यांची 26 जानेवारी रोजी हैदराबादमध्ये एका शानदार सोहळ्यात लग्न झाले. या सोहळ्याला तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी हातात हात घालून पोहोचले आणि लवकरच लग्न होणार असल्याच्या चर्चा सध्या चांगल्याच चर्चेत आहे.
सिद्धार्थने प्रिंटेड कुर्ता आणि बांधगला घातला होता, तर अदिती पिवळ्या साडी आणि हिरव्या ब्लाउजमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये जाऊन दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार का ? असा प्रश्न आता विचारला आहे.
#AditiRaoHydari and #Siddharth at #Sharwanand engagement function ❤💍 pic.twitter.com/9WMex60gwo
— Actress Gallery (@actressgalIery) January 26, 2023
28 ऑक्टोबरला आदिती रावच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थने खास शुभेच्छा दिल्या. सिद्धार्थने तिच्यासोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि या फोटोला कॅप्शन लिहिले की, “हृदयाची राजकुमारी @aditiraohydari वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत अशी माझी इच्छा आहे. मोठी, छोटी. आणि अद्याप न पाहिलेली. ती नेहमी साकार होवोत, नेहमी तुमच्यासाठी तिथे असू द्या.”