IND vs NZ – एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला ३-० ने पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आता टी-२० मालिकेतही यश मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेची सुरुवात उद्या रांची येथे होणार्या पहिल्या टी-२० सामन्याने होणार आहे. शुक्रवारी होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ तेथे पोहोचले आहेत. सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी आज मैदानावर जोरदार सराव केला. यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना भेटण्यासाठी पोहोचला होता. धोनीने हार्दिकच्या नेतृत्वातील युवा सेनेसोबत बराच वेळ गप्पाही मारल्या. या भेटीचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.
कोल्हापूरच्या पठ्ठ्याचा नादचं खुळा! क्रिकेटच्या वेडापायी सातवीत शिकणारा चिमुरडा बनला कोट्याधीश
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केव्हाच निवृत्ती घेतली आहे, पण तो आजही चाहत्यांसाठी आवडता खेळाडू राहिलाय. रांची येथे धोनीने ड्रेसिंग रूममध्ये पोहोचल्यानंतर खेळाडू आणि स्टाफ सदस्यांच्या भेटी घेतल्या आणि खेळाडूंशी संवादही साधला. धोनी बोलत असताना इतर युवा खेळाडू एखाद्या विद्यार्थ्यांसारखे कान लावून ऐकत होते. धोनी सांगत असलेल्या गोष्टींचा खेळाडू आनंद लुटताना दिसले. हा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “आज रांचीमध्ये सराव सत्रादरम्यान कोण आले ते पाहा, महान खेळाडू एमएस धोनी.”
Look who came visiting at training today in Ranchi – the great @msdhoni! 😊#TeamIndia | #INDvNZ pic.twitter.com/antqqYisOh
— BCCI (@BCCI) January 26, 2023
ऋतुराज गायकवाड मालिकेतून बाहेर
भारतीय संघाचा सलामीचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड हा या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला त्याच्या जाग्यावर दुसऱ्या खेळाडूला खेळवावे लागणार आहे. ऋतुराज सध्याच्या रणजी करंडक हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये खेळात होता. त्याने १७ जानेवारीला हैदराबाद संघाविरुद्ध रणजी करंडकाचा सामना खेळला होता. मात्र त्या सामन्यात आपल्या फलंदाजीने काही खास खामगिरी करता आली नव्हती. त्या सामन्यानंतर ऋतुराजने खांद्याला दुखापत झाली असून त्रास होत असल्याचे बोर्डाकडे कळवले होते. त्यामुळे ऋतुराज गायकवाड त्याच्या दुखापतीमुळे आता न्यूझीलंडविरुद्ध उद्यापासून सुरु होणाऱ्या टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे.