मुंबई – बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्टार किड्सच्या यादीतील सर्वात फेमस व्यक्तिमत्व असलेली सुहाना नेहमीप्रमाणे एका पार्टीतील व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. अवघ्या काही सेकंदांचा असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलीच धुमाकूळ घालतोय.
सुहाना अनेकदा बॉलिवूड पार्ट्यांमध्ये दिसून येते. स्टार किड्ससह पार्ट्यांना हजेरी लावायला सुहानाला नेहमीच आवडते. म्हणूनच ती आपल्या फ्रेंड्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या पार्टीजमध्ये स्पॉट होताना दिसते. आता देखील सुहाना सुपरमॉडेल केंन्डल जेनरच्या एका पार्टीमध्ये दिसून आली. यावेळी तिच्यासोबत शनाया कपूर देखील होती. सुहानाचा यावेळेसचा बोल्ड अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. म्हणूनच सुहानाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
View this post on Instagram
डीप नेक शॉर्ट ड्रेसमध्ये असलेला सुहानाचा लूक पाहून सोशल मीडियावर कमेंटचा अक्षरशः पाऊस पडला आहे. ‘लवकर एखादा चित्रपट साइन कर’ असा सल्ला तिला एका चाहत्याने दिला आहे. तर दुसऱ्याने तिची तुलना थेट मिया खलिफाशी केली आहे. काहींनी तिचे कौतुक केले आहे तर काही नेटकरी तिच्यावर भडकल्याचे देखील दिसून येते.