नवी दिल्ली – मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गडा गावातील बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र शास्त्री ५ जानेवारी ते १३ जानेवारी या कालावधीत भगवद् -कथेसाठी नागपुरात होते.यानंतर त्यांची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु झाली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यामध्ये उडी घेतल्यानंतर तर शास्त्री यांची दखल जणू सर्व मीडियाने घेतल्याचे दिसून आले.शास्त्री यांच्याबाबतची वेगवेगळी मते देखील समोर येऊ लागली आहेत. ‘काही दैवी शक्ती या जन्मापासूनच येतात’ असे स्पष्ट मत रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी शास्त्रींबाबत व्यक्त केले आहे.
तुम्ही जितके उंच उभे राहाल तितके दूर तुम्ही पाहू शकता असं म्हणत राय म्हणाले की, “जर देवाने एखाद्याला अशी जन्मजात शक्ती दिली असेल जिथे त्याची आंतरिक क्षमता इतक्या उंचीवर असेल की तो इतरांचे मन समजू शकेल तर त्यात काय अडचण आहे ?”काही हिंदू मझारवरही जातात. तिथं कुणाला शांतता दिसली, तर त्याला रोखणारे आपण कोण ? असं स्पष्ट मत देखील यावेळी राय यांनी व्यक्त केले आहे.
UP | I usually don’t get into these things. Some god-like powers come from birth. The higher you stand, the farther you can see: Champat Rai, General Secy, Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra, when asked about Bageshwar Dham chief Dhirendra Shastri pic.twitter.com/ghqjcgFnjB
— ANI (@ANI) January 23, 2023
कोण आहेत धीरेंद्र शास्त्री आणि ते इतके लोकप्रिय कसे झाले ?
गेल्या काही वर्षांत मध्य प्रदेशात तांत्रिक आणि कथा सांगणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे.२५ वर्षीय शास्त्री हे त्यापैकी एक आहेत. काही वर्षांपूर्वी ते ऑटोरिक्षाचालक होते, असा स्थानिकांचा दावा आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत बागेश्वर धाम हे एक छोटेसे मंदिर होते आणि मुख्यतः शास्त्रींनी केलेल्या चमत्कारांमुळे त्याची लोकप्रियता वाढली. अलीकडे या गावात रस्ते, भोजनालये, हॉटेल्स अशा अनेक मूलभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत.
शास्त्री हे मुख्यतः त्रासलेल्या लोकांना त्यांच्या निवासस्थानी बोलावण्यासाठी ओळखले जातात, जिथे ते त्यांच्या समस्या सोडवतात आणि त्यांना त्यांच्या भूतकाळाबद्दल सांगतात. बहुतेक तांत्रिक राज्याच्या आश्रयाने भरभराट करतात परंतु शास्त्री वेगळे नाहीत. बुंदेलखंड प्रदेशातील बहुतेक आमदार शास्त्रींना आदर देतात. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा हे देखील शास्त्रींचे अनुयायी असून त्यांनी धामला भेट दिली आहे.