नांदेड – दिनांक 25 जानेवारी पासून आठवड्यातून दोन वेळा प्रमाणे सुरु होत असलेल्या नांदेड-कुर्ला नवीन रेल्वेचा दररोज चालविण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना ईमेल द्वारे करण्यात आली आहे. सोबतच सदर रेल्वेचा दोन तासाच्या लूज टाईम रद्द करून कुर्ला येथे सकाळी सुमारे 10 पर्यंत पोहोचविण्यात यावे, सदर रेल्वेला सध्या दोन वेगवेगळे नंबरवर चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रवाश्यांना होणाऱ्या अडचणीची लक्षात घेता दोन्ही नांदेड-कुर्ला साप्ताहिक रेल्वे गाड्यांना एकच नंबरवर चालविण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा. सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, डाॅ राजगोपाल कालानी, रूस्तुम कदम, श्रीकांत गडप्पा, कादरीलाला हाशमी, दयानंद दीक्षित, अरुण पवार, श्रीकांत अंबोरे इत्यादींनी केली आहे.
पहिली गाडी क्र. 02748 नांदेड-कुर्ला नवीन साप्ताहिक रेल्वे दि. 25 जानेवारी पासून दर बुधवारी नांदेड येथून रात्री 9.15 ला निघून कुर्ला येथे दुसर्या दिवशी दुपारी 1 ला वाजता पोहोचणार आहे. परतीत दिनांक 26 जानेवारी पासून गाडी क्र. 02749 कुर्ला-नांदेड दर गुरुवारी कुर्ला येथून सायंकाळी 4.55 ला निघून नांदेड येथे दर बुधवारी सकाळी 9 वाजता पोहोचणार आहे.
दूसरी गाडी क्र. 02746 नांदेड-कुर्ला साप्ताहिक रेल्वे दि. 30 जानेवारी पासून दर सोमवारी नांदेड येथून रात्री 9.15 ला निघून कुर्ला येथे दुसर्या दिवशी दुपारी 1.30 वाजता पोहोचणार आहे. परतीत गाडी क्र. 02747 कुर्ला-नांदेड साप्ताहिक रेल्वे दि. 31जानेवारी पासून दर मंगळवारी कुर्ला येथून सायंकाळी 4.40 ला निघून नांदेड येथे दर बुधवारी सकाळी 9.30 वाजता पोहोचणार आहे.
परभणीकराना देखील अनुकूल
आठवड्यातून दोन वेळा प्रमाणे घोषित नवीन नांदेड-कुर्ला साप्ताहिक रेल्वे परभणीकराना देखील सोयीचे सिद्ध होणार आहे. सध्या परभणी मार्गे मुंबई कडे जाणार्या देवगिरी, नंदिग्राम, राज्य राणी, इत्यादी सर्व रेल्वेत आठवड्यापूर्वी देखील टिकट परभणी कराना मिळत नसल्याने अशा परिस्थितीत जरूरी कामानिमित्त मुंबईला जाणार्या प्रवाश्यांना 25 जानेवारी पासून होऊ घातलेले नांदेड-कुर्ला नवीन रेल्वे उपयुक्त साबीत होणार आहे. तर परभणीकर एसटी ने बसमत गाटून किंवा हायकोर्टाने पूर्णेला जाऊन नांदेड-कुर्ला रेल्वेने मुंबई जाणे उपयुक्त ठरणार आहेत.