नवी दिल्ली :– एअर इंडियाच्या लघुशंका प्रकरणाची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअर इंडिया विमान कंपनीला 30 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे, विमानाच्या पायलट-इन-कमांडचा परवानाही तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. विमानाच्या पायलट-इन-कमांडवर विमान नियम, 1937 च्या कलम 141 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
– नागरी विमान वाहतूक संचालयाने केला 30 लाखांचा दंड
– वैमानिकाचे लायसन्सही तीन महिने निलंबीत
या गंभीर प्रकरणात एअर इंडिया विमान कंपनीने आपले उत्तरदायित्व नीटपणे पार पाडले नाहीं असा आरोप आहे. त्याची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कारवाईपुर्वी विमान वाहतूक महासंचालयाने विमान कंपनी आणि विमान कर्मचाऱ्यांना नोटीसा जारी करून त्यांना त्यांची भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली होती, असे डीजीसीएने निवेदनात म्हटले आहे.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात शंकर मिश्रा नावाच्या एका व्यक्तीने एअर इंडियाच्या विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये मद्यधुंद अवस्थेत एका महिलेवर लघुशंका केल्याची घटना घडली होती.
ते प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणात एअर इंडियाने संबंधीत प्रवाशाच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यासही विलंब केला होता.
एम.फील.अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्याबाबत शासन सकारात्मक – मंत्री चंद्रकांत पाटील
या कंपनीने प्रत्यक्ष घटना घडल्यानंतर सुमारे दीड महिन्यानंतर म्हणजे 4 जानेवारी रोजी पोलिस तक्रार दाखल केली आहे. अमेरिकेतील वित्तीय सेवा कंपनी वेल्स फार्गोनेही या घटनेनंतर कर्मचारी शंकर मिश्रा यांना कामावरून काढून टाकले आहे.