कोलकाता (पश्चिम बंगाल) – शिक्षक भरती घोटाळ्याच्या संदर्भात ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी तृणमूल कॉंग्रेसचे नेते शांतनु बॅनर्जी यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. शंतनु बॅनर्जी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे पक्षाचे नेते कुंतल घोष यांच्या निवासस्थानावरही छापे टाकण्यात येत आहेत.
बॅनर्जी आणि घोष या दोघांवरही या प्रकरणात मध्यस्थ म्हणून काम केल्याचा आरोप आहे, अशी पुष्टी सूत्रांनी केली आहे. पश्चिम बंगालचे माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी हे पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग भरती घोटाळ्याच्या चौकशीला सामोरे जात आहेत.
Air India urination case : विमानातील लघुशंका प्रकरणात एअर इंडियाला DGCA चा दणका
गेल्या वर्षी, अंमलबजावणी संचालनालयाने पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्यासह आठ आरोपींविरुद्ध पीएमएलए विशेष न्यायालयालयात खटला दाखल केला आहे.