नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी ‘ऑर्गनायझर’ आणि ‘पांचजन्य’ला दिलेल्या मुलाखतीत एलजीबीटी समुदायाचे समर्थन केले आहे या उलाखाती दरम्यान ते म्हणाले आहे की,’त्यांचा एक खासगी अवकाशही मिळावा आणि त्यांना इतर समाजाप्रमाणे आम्हीही आहोत.’
मोहन भागवत म्हणाले,’आपली परंपरा कोणताही आरडाओरडा न करता एलजीबीटी समुहाची व्यवस्था करत आली आहे. असाच विचार पुढेही करावा लागेल. कारण इतर गोष्टींनी उत्तर सापडलेलं नाही आणि सापडणारही नाही, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे संघ आपल्या अनुभवाला विश्वासार्ह मानून काम करत आहे.’ असं भागवत यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, “मी जनावरांचा डॉक्टर आहे. जनावरांमध्येही एलजीबीटीप्रमाणे प्रकार असतात. ही एक बायोलॉजिकल अवस्था आहे. एलजीबीटी समूह त्याचाच भाग आहे. मात्र, त्याचा फार मोठा प्रश्न तयार करण्यात आला. तेही समाजाचा भाग आहेत. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांना त्यांचा एक खासगी अवकाशही मिळावा आणि त्यांना इतर समाजाप्रमाणे आम्हीही आहोत असं वाटावं असा सहभागही करता यावा.” असेही ते म्हणाले आहे.