मुंबई : उर्फी जावेद तिच्या कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते आणि त्यामूळे ट्रॉलर्सच्या निशाण्यावर येते. उर्फी जावेदने अशी कोणतीही वस्तू सोडली नाही ज्याच्यापासून तिने तिची फॅशन तयार केली नाही. तिच्या या फॅशनमुळे अनेक लोकांनी तिच्यावर टिका केली आहे. दरम्यान,नुकतेच भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर टीका करत तिला अटक करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला आता उर्फी जावेदने कडक उत्तर दिले आहे.
चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ शेअर करत ट्वीट करत म्हणाले की, “श्शीSSS…अरे हे काय चाललंय मुंबईत? रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही? तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला, मुली विकृतांच्या शिकार होतायत तर ही बया अजून विकृती पसरवतीये.” त्यानंतर उर्फीने तिची नवीन स्टाईल दाखवली. इतकच नाही तर तिने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या ट्वीटला कडक उत्तर दिले आहे.
उर्फी जावेदने ट्वीट करत,’आज राजकारण्यांना पाहून वाईट वाटते. लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला लक्ष्य करत आहे. बलात्कारासाठी माझ्या कपड्यांना दोष देणं, सोयीचं आहे. नेहमीच पीडितेच्या कपड्यांना दोष दिला जातो अनेक मूद्दे आहेत. जसं बेरोजगारी, लाखो प्रलंबित बलात्कार प्रकरणं, खून. या प्रकरणांचे काय?’असे म्हटले आहे.
तर दुसऱ्या ट्वीटमध्ये उर्फी म्हणते,’तुमच्यासारखे राजकारणी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा बाजूला ठेवतात. तुम्हाला माझ्याबद्दल बोलून जनतेचं लक्ष वेगळ्या विषयाकडे वळवायचे आहे. ज्या महिलांना मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात काही का करत नाही? महिलांचे शिक्षण, प्रलंबित असलेली बलात्काराची प्रकरणे, याकडे तुम्ही लक्ष का देत नाही?’ आता उर्फीचा रिप्लाय चर्चेत आला आहे. नेटकरी या उत्तराला सकारात्मकही बाजूने घेत आहेत तर काही यावर उलट सुलट प्रतिक्रिया देत आहेत.