मुंबई – रितेश देशमुख आणि जेनेलिया या जोडीचा वेड हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातील गाण्याने अवघ्या बॉलिवूडला नाचायला भाग पाडले आहे.बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टारने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रितेशसोबत डान्स केल्याचे सर्वांनी पाहिले. आता अभिनेत्री काजोलने देखील रितेश जेनेलियासाठी आपल्या सोशल मीडियावरून एक खास पोस्ट केली आहे.
कॉलेज जीवनापासून सुरु झालेल्या प्रेमाचा प्रवास या चित्रपटात पाहायला मिळणार असल्यामुळे तरुणाईमध्ये चित्रपटाविषयी चांगलीच उत्सुकता आहे.त्यासोबतच अजय अतुलने या चित्रपटाला भन्नाट म्युजिक दिले आहे. या चित्रपटाचे नुकतेच प्रदर्शित झालेले एक गाणे अभिनेत्री काजोलने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. “निस्वार्थ प्रेमापेक्षा मोठं वेड काय असू शकतं?” अशा आशयाचे कॅप्शन देखील काजोलने यावेळी दिले आहे.
View this post on Instagram
खऱ्या आयुष्यात पती पत्नी असलेल्या रितेश जेनेलियाची जबरदस्त केमेस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. स्वतः रितेशने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेलं असल्यामुळे चित्रपटाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहेत. ट्रेलरसह चित्रपटातील सर्व गाणी हिट झाल्यामुळे आता चित्रपटाच्या रिलीजची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.