अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेवरून भाजपने कॉंग्रेसला घेरण्याचे प्रचारतंत्र अवलंबले आहे. त्यामुळे गुजरात रणसंग्रामाच्या केंद्रस्थानी पुन्हा मोदी आल्याचे दिसते. गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. अशात भाजपने आता प्रचाराची रणनीती बदलून ती मोदीकेंद्री बनवल्याचे सूचित होत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.
700 साल के कलंक को मिटाकर अयोध्या में भव्य राम मंदिर का निर्माण करने वाले नरेंद्र मोदी जी को गाली देने की धारिष्ट जिस प्रकार से कांग्रेस के अध्यक्ष ने किया है,केवल हम नहीं,पूरा देश उनकी निंदा कर रहा है। गुजरात की जनता उनको माफ नहीं करेगी।
(BJP Media Centre,Ahmedabad |30th Nov 22) pic.twitter.com/uFXXF9HD51— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 1, 2022
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसा काँग्रेसला त्यांचा पराभव खूप स्पष्टपणे दिसत आहे. आजपर्यंतचा इतिहास पाहा, काँग्रेसला जेव्हा जेव्हा त्यांचा पराभव होताना दिसलं तेव्हा तेव्हा काँग्रेसचे नेते मोदींना शिव्या देणं सुरू करतात. मोदींच्या विकासाच्या मॉडेलला काहीही तोड नाही, त्यापेक्षा मोठं मॉडेल आपण दाखवू शकत नाही आणि त्याचा विचारही करू शकत नाही, असं काँग्रेस नेत्यांना लक्षात येतं तेव्हा ते मोदींना शिव्या देणं सुरू करतात.” असेही ते म्हणाले आहे.