झारखंड : भारतात शेकडो लहान-मोठ्या नद्या वाहतात. या नद्या लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधनही आहेत. अनेक राज्यातील शेतकरी शेतीसाठी नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पण आज आम्ही तुम्हाला भारतातील एका नदीबद्दल सांगणार आहोत ज्यातून चक्क सोने बाहेर येते. ही नदी जवळपास राहणाऱ्या लोकांसाठी उत्पन्नाचे साधन आहे.
खरे तर लोक या नदीतून सोने काढतात आणि ते विकून पैसे कमावतात. या पैशातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र या नदीत सोने कुठून येते हे सर्वात मोठे रहस्य आहे. याबाबत कोणालाच माहिती नाही. हे जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी संशोधन केले, पण त्यांनाही यश मिळू शकले नाही. त्यामुळे नदीत सोने कोठून येते हे आजही रहस्य आहे. ही नदी भारतात कुठे वाहते ते जाणून घेऊया.
ही नदी भारताच्या झारखंड राज्यात वाहते, तिचे नाव स्वर्णरेखा नदी आहे. ही नदी पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्येही वाहते. झारखंडची राजधानी रांचीपासून 16 किमी अंतरावर छोटा नागपूरच्या पठारावर वसलेल्या नगडी गावातील चुआ येथून ती उगम पावते. या नदीची एकूण लांबी 474 किमी आहे. ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते.
झारखंडमध्ये, जिथून सुवर्णरेखा नदी वाहते, तिथून लोक पहाटेपासून सोने काढण्यासाठी वाळू उपसा करतात. पिढ्यानपिढ्या लोक त्यातून सोने काढत आहेत आणि पैसे कमवत आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या नदीतून सोने काढतात.
सुवर्णरेखा नदीत सोने कोठून येते हे अद्यापपर्यंत गूढ आहे. सुवर्णरेखा नदी खडकांमधून येते असे काही भूवैज्ञानिकांचे मत आहे. कदाचित त्यामुळेच त्यात सोन्याचे कण सापडत असतील. मात्र, याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही.
Hingoli : ऊसतोड कामगारांच्या मुलींची यशस्वी झेप; एक मुलगी ‘Engineer’ तर दोन मुली ‘MBBS’साठी पात्र
सुवर्णरेखा नदीच्या उपनदीतूनही सोने बाहेर येते. सुवर्णरेखाची उपनदी करकरी नदीच्या वाळूतही सोन्याचे कण बाहेर पडतात. यातूनही लोक सोने काढतात. सुवर्णरेखा नदीत करकरी नदीतून सोने येते असाही अंदाज आहे.