भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी उत्तम राहिली, मात्र संघाची गोलंदाजी कमकुवत असल्याचे जाणवले. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ३०७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या संघाने ७ गडी राखून सामना जिंकला. सामन्यादरम्यान भारतीय संघाला सहाव्या गोलंदाजांची कमतरता जाणवली. त्यामुळे आता सामन्यासाठी संघ निवडताना कर्णधार शिखर धवनने एखादा गोलंदाज जास्त खेळवण्याचा निर्णय का घेतला नाही असा सवाल उपस्थित केला जातोय.
#NZvsIND | वॉशिंग्टन सुंदरने एकदम सूर्यासारखा शॉट खेळला, व्हिडिओ व्हायरल!
या सामन्यात भारताने शार्दूल ठाकूर, अर्शदिप सिंग, उमरान मलिक आणि युझवेन्द्र चहल यांना गोलंदाज म्हणून तर वॉशिंग्टन सुंदरला अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळवले होते. याव्यतिरिक्त गरज भासल्यास गोलंदाजी करू शकेल असा एकही खेळाडू संघाकडे नव्हता. त्यामुळे संघातील पाच गोलंदाजांवर वर्चस्व मिळवणे न्यूझीलंडला सहज शक्य झाले. न्यूझीलंड संघाकडून टॉम लॅथम आणि केन विल्यमसन यांनी भारतीय गोलंदाजासमोर दमदार फलंदाजी केली. गोलंदाजीत भारताकडून उमरान मलिकने १० षटकांत ६६ धावा खर्च करत २ गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्याव्यतिरिक्त शार्दूल ठाकूरने १ गडी बाद केला. मात्र, संघातील इतर कोणत्याही गोलंदाजाला गाडी बाद करण्यात यश आले नाही.
#NZvsIND | वॉशिंग्टन सुंदरने एकदम सूर्यासारखा शॉट खेळला, व्हिडिओ व्हायरल!
भारताकडून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर शिखर धवन आणि शुबमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी १२४ धावांची भागीदारी केली होती. यानंतर गिल (५० धावा) तर धवन (७२ धावा) करून लागोपाठ बाद झाले. श्रेयस अय्यरने सावध फलंदाजी करत संघाची धावसंख्या सुरूच ठेवली. मात्र, दुसऱ्या बाजूने ऋषभ पंत ( १५ धावा) आणि सूर्यकुमार यादव (४ धावा) करून बाद झाले. संजू सॅमसनने ३६ धावांचे योगदान दिले. अय्यर शतकापासून चुकला आणि ८० धावांवर टीम साऊदीचा बळी ठरला. यानंतर वॉशिंग्टन सुंदरने फिनिशरची भूमिका घेत भारताला ३०० धावांचा टप्पा पार करून दिला.