भोपाळ – कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी गुरूवारी प्रथमच भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ती यात्रा सध्या मध्यप्रदेशातून मार्गक्रमण करत आहे.
राहुल आणि त्यांच्या भगिनी प्रियंका यात्रेत प्रथमच एकत्र दिसणार असल्याने त्या घडामोडीचे महत्व वाढले. प्रियंका यांच्या समवेत त्यांचे पती रॉबर्ट वढेरा आणि पुत्र रेहान हेही यात्रेत सहभागी झाले. राहुल आणि प्रियंका एकत्र असल्याने कॉंग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड उत्साहित झालेले दिसले.
रास्तों से लड़कर हमने कई मुक़ाम बनाए हैं। साथ हैं तो यकीन है, मंज़िल ज़रूर पाएंगे। pic.twitter.com/hDuIdsVoNr
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 24, 2022
अनेकांनी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आवर घालताना पोलिसांची दमछाक झाली. राहुल आणि प्रियंका यांच्या समवेत पक्षाचे राजस्थानमधील तरूण नेते सचिन पायलट हेही यात्रेत सहभागी झाले.