दोहा – जगातिक सर्वात यशस्वी फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा सध्या कतारमध्ये सुरू आहे. क्रिकेटला कित्येक मैल मागे टाकेल अशी श्रीमंती या खेळाला असतेच. त्यातच हा विश्वकरंडक असल्याने सामने पाहण्यासाठी तासन्तास तिकिटांसाठी रांगा लावणारे तसेच ऑनलाइन तिकिटे खरेदी करणारे लाखो प्रेक्षक पाहायला मिळतात.
मात्र, या स्पर्धेतील सामन्यांच्या तिकिटांची किंमत ऐकली तरी घाम फुटेल असेच वातावरण सध्या आहे. सध्या साधे तिकीट भारतीय रुपयांमध्ये पाहिले तर तब्बल 37 हजार रुपयांना विकले जात आहे. 20 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना हा 18 डिसेंबर रोजी होणार आहे.
विजयी सातत्य राखण्यासाठी भारत सज्ज, न्यूझीलंडविरुद्ध उद्या पहिला एकदिवसीय सामना
विश्वचषक स्पर्धेत एकूण 32 संघांनी सहभागा घेतला आहे. त्यात आशियातील 6 संघ आहेत, पण, त्यात भारत नाही. तरीही, भारतातही फुटबॉलचे लाखो चाहते आहेत. भारतात सर्वात जास्त लोकप्रिय असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी चाहत्यांना मोठा भुर्दंड बसत नाही.
स्पर्धेतील सामन्यांचे सामान्य तिकीट 400 रुपयांना मिळते. मात्र, विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी चाहत्यांना लाखो रुपये मोजावे लागत आहेत. आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मौसमात सर्वात जास्त किमतीचे तिकिट 35,000 रुपये होते.
विजयी सातत्य राखण्यासाठी भारत सज्ज, न्यूझीलंडविरुद्ध उद्या पहिला एकदिवसीय सामना
मात्र, विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या साखळी सामन्यांसाठी महत्त्वाच्या संघांतील सामने पाहायचे असतील तर खास तिकीट 53 हजार ते 4 लाख 79 हजार रुपये ठेवण्यात आले आहे. उपांत्यपूर्व सामन्याच्या तिकिटाची किंमत 37 हजार ते 8 लाख रुपये आहे. उपांत्य फेरीच्या सामन्याच्या तिकिटांचा दर 77 हजार ते 3 लाख 50 हजार रुपये आहे. तर अंतिम सामन्याच्या तिकिटाचा दर तब्बल 2 लाख 25 हजार रुपये ते 13 लाख 39 हजार रुपये इतका प्रचंड आहे.