नगर – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज नगरमध्ये आले असता त्यांनी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या निवासस्थानी धावती भेट दिली. गंधे परिवाराच्या वतीने मंत्री गडकरी यांचे स्वागत महेंद्र गंधे व मीनल गंधे यांनी केले. यावेळी मल्हार गंधे, ऋग्वेद गंधे व रश्मी गंधे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार. डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते आदींसह शहर भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित तसेच गंधे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
यावेळी गंधे यांनी मंत्री गडकरी यांना शहरात भाजपचे चालू असलेल्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून त्यांना केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त कामे करा, असे यावेळी मंत्री गडकरी यांनी गंधे यांना सांगून पक्ष बळकटीसाठी करत असलेल्या कामाबद्दल अभिनंदन केले.