पुणे :- प्रो-कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी झालेल्या लढतीत पाटणा पायरट्स संघाने यु मुंबा संघाचा 34-31 असा पराभव केला. या विजयाच्या जोरावर पाटणा पायरट्स संघाने स्पर्धेतील आपली घोडदौड कायम राखली आहे.
या सामन्यात पाटणा संघाच्या सचिनने अफलातून कामगिरी करताना 12 गुण मिळवत चांगल्या पकडी केल्या. त्याला सुरेख साथ देताना सुनीलने 6 गुणांची कमाई करत यु मुंबावर लोण चढवण्यात मोलाची भूमीका वठवली. यु मुंबा संघाचा बचाव या सामन्यात काहीसा कमकुवत ठरला व त्याला लाभ पाटणा संघाने घेतला.
We all know the team discussion that the Pirates had at HT:
𝙋𝙞𝙘𝙩𝙪𝙧𝙚 𝙖𝙗𝙝𝙞 𝙗𝙖𝙠𝙞 𝙝𝙖𝙞 𝙢𝙚𝙧𝙚 𝙙𝙤𝙨𝙩
How stunning has their comeback been 💚#vivoProKabaddi #FantasticPanga #PATvMUM pic.twitter.com/qG1kiE5Obh
— ProKabaddi (@ProKabaddi) November 4, 2022
यु मुंबाच्या आशिष व जय भगवानने तुल्यबळ लढत दिली. आशिष जयने प्रत्येकी 7 गुण मिळवताना पाटणा संघाला निकराची लढत दिली मात्र, त्यांना अन्य खेळाडूंची म्हणावी तशी साथ लाभली नाही व त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
पाटणा व यु मुंबा संघांनी प्रत्येकी 16 रेड गुण मिळवले मात्र, पकडीत पाटणा संघ जास्त सरस ठरला. चार ऑल आऊट गुणांमध्येही पाटणा संघानेच बाजी मारली. या सामन्यात यु मुंबाच्या सुरेंद्र सिंगसह प्रमुख खेळाडू साफ अपयशी ठरले.