Pro Kabaddi League 2024 (New Delhi) – प्रो कबड्डी लीगच्या 69व्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सचा स्टार रेडर अर्जून देशवावलने (एकूण 16 गुण) इतिहास रचत आपले 800 रेड पाँइंट्स पूर्ण केले. अनेक दिग्गजांना मागे सोडले. त्यामुळे तो अशी कामगिरी करणारा तो 9वा रेडर ठरला. तसेच अर्जूनने सर्वाधिक रेड पॉइंट मिळवणाऱ्या रेडर्सच्या यादीत अजय ठाकूरलाही मागे टाकले.
अर्जूनच्या कामगिरीमुळे जयपूर पिंक पँथर्सने या सामन्यात पुणेरी पलटणचा 36-34 असा पराभव केला आणि त्यांची 8 सामन्यांची विजयी मालिकाही खंडित केली. या सामन्याच्या निकालामुळे गुणतालिकेत कोणताही बदल झाला नाही. पुणे अजूनही पहिल्या तर जयपूर दुसऱ्या स्थानावर आहे.
जयपुर के पैंथर्स ने रोका पलटन का विजयी रथ 🤯🔥
कांटे की टक्कर वाले मुक़ाबले में शानदार प्रदर्शन करते हुए हासिल की अपनी आठवीं जीत 🩷#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #JPPvPUN #JaipurPinkPanthers #PuneriPaltan pic.twitter.com/uMuPlnLPry
— ProKabaddi (@ProKabaddi) January 13, 2024
अर्जुनसह कर्णधार सुनील कुमारने बचावात 5 टॅकल पॉइंट घेतले. पुणेरी पलटणसाठी अस्लम इनामदारने चढाईत 8 राइड पॉइंट घेतले आणि बचावात मोहम्मदरेझा शादलू आणि गौरव खत्रीने प्रत्येकी 2 टॅकल पॉइंट घेतले. अखेरपर्यंत जयपूरने शानदारपणे आघाडी कायम ठेवली आणि सामना जिंकला. पुणेरी पलटणला अवघ्या एका गुणावर समाधान मानावे लागले.