मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळावा घेतला. या मेळाव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिंदे समर्थक उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यप्रणालीबाबत अनेक सवाल उपस्थित केले. तसेच या भाषणातून शिंदे यांनी पंतप्रधान मोदींसह अमित शहांचे देखील कौतुक केले. BKC मैदानावरील भाषण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीने लिहून दिलेली स्क्रिप्ट होती असं म्हणत राष्ट्रवादीकडून शिंदे यांच्या भाषणावर निशाणा साधण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाबाबत भाष्य केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात,”मा. मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री पदाला साजेस असं उद्बोधन करायला हव होतं मात्र भारतीय जनता पार्टीचे प्रचारक म्हणून जे लांबलचक आणि कंटाळवाणे भाषण आज महाराष्ट्राच्या जनतेने ऐकले त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून जमवलेली जनता व स्वतःला सिद्ध करणारे बंडखोर सर्वांचे चेहरे पडले.” असा टोला लगावला आहे.
मा. मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री पदाला साजेस असं उद्बोधन करायला हव होतं मात्र भारतीय जनता पार्टीचे प्रचारक म्हणून जे लांबलचक आणि कंटाळवाणे भाषण आज महाराष्ट्राच्या जनतेने ऐकले त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून जमवलेली जनता व स्वतःला सिद्ध करणारे बंडखोर सर्वांचे चेहरे पडले.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) October 5, 2022
मिटकरी पुढे म्हणतात,””एक मात्र खरे की दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भाजपाचा “केमिकललोच्या” झाला. ना शिंदे गटाच्या मेळाव्यात स्थान, ना पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात, ना शिवतीर्थावर.. भाजपरूपी इतरांची घरे फोडणारा दशासान भविष्यात असाच मातीत मिसळणार हे नक्की.ते पुढे म्हणतात,माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आजचे BKC मैदानावरील भाषण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीने लिहून दिलेली स्क्रिप्ट . या भाषणात नरेंद्रजी मोदी ,RSS व भारतीय जनता पार्टीवर स्तुती सुमने तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेवर आगपाखड त्यापलीकडे काहीच नाही.”
माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आजचे BKC मैदानावरील भाषण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीने लिहून दिलेली स्क्रिप्ट . या भाषणात नरेंद्रजी मोदी ,RSS व भारतीय जनता पार्टीवर स्तुती सुमने तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेवर आगपाखड त्यापलीकडे काहीच नाही.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) October 5, 2022