बेंगळुरू – काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी गुरुवारी कर्नाटकातील भारत जोडो यात्रेत सामील झाल्या. कर्नाटकातील मंड्या येथे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पदयात्रेत सोनिया गांधी सहभागी झाल्या होत्या. सोनिया यांच्यासोबत फिरल्या. यावेळी राहुल गांधी आई सोनिया गांधी यांच्या शूजची लेस बांधताना दिसले. भारत जोडो यात्रा आज पांडवपुरा ते नागमंगला तालुक्यापर्यंत जाणार आहे.
अध्यक्षपदावरून पक्षात गदारोळ सुरू असताना सोनिया गांधी काँग्रेसच्या पदयात्रेत सहभागी झाल्या. काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे.
ब-याच दिवसांनी सोनिया एका सार्वजनिक कार्यक्रमात हजर झाल्या आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये प्रचारही केला नव्हता. भारत जोडो यात्रा सुरू असताना सोनिया गांधी परदेशात उपचार घेत होत्या. त्यावेळी त्यांच्या आईचेही निधन झाले. प्रियंका आणि राहुलही सोनियांसोबत इटलीला गेले होते. सोनिया काही दिवसांपूर्वीच भारतात परतल्या आहेत.