नवी दिल्ली : उत्तराखंडच्या पौडी जिल्ह्यात भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. ४५ ते ५० जणांना घेऊन जाणारी एक बस खोल दरीत कोसळली असून या अपघातात ३२ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर अपघातात २० जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी रवाना झाले होते. बस ५०० मीटर खोल दरीत पडल्याने बचावकार्यात अनेक अडचणी येत होत्या. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे
#UPDATE | Uttarakhand: A bus carrying 45 to 50 people fell into a 500-metre gorge. So far 6 people have been rescued and sent to the hospital: DGP Ashok Kumar https://t.co/2mpJTi4ICb pic.twitter.com/i6sJv412Gl
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 4, 2022
ही घटना उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावाजवळ घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. येथील रिखनिखल-बिरोखल रस्त्यावर असणाऱ्या एका दरीत ही बस कोसळली. बसमध्ये ५० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
प्रांताधिकारी सदर प्रेमलाल टम्टा यांनी अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला. धुमाकोट आणि रिखनिखल पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाल्याची माहितीही टम्टा यांनी दिली होती. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती डीजीपी अशोक कुमार यांनी दिली आहे.