मुंबई – अभिनेत्री नुपूर अलंकार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे आणि तिच्या प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे कारण तिचा आगामी प्रोजेक्ट नसून तिचे वैयक्तिक आयुष्य आहे. नुपूरने अभिनय जगताला कायमचा अलविदा करून अध्यात्माचा मार्ग निवडला आहे. ती संन्यासी झाली आहे. अशा परिस्थितीत ती चक्क रस्त्यावर भिक्षा मागताना आढळून आली आहे.
नूपुरने भलेही ग्लॅमरस दुनियेपासून दूर गेली असेल पण ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नुपूर अनेकदा तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिच्या रोजच्या आयुष्यातील झलक दाखवते.असाच एक व्हिडीओ पोस्ट करत तिने आपला भिक्षा मागण्याचा अनुभव सांगितला आहे.ज्यात ती म्हणते पहिल्यांदाच बिना साखरेचा चहा तिने घेतला तो ही एका व्यक्तीने भीक दिला. तसेच पुढे ती आपल्या दिवसाच्या भिक्षा स्वरूपाबाबत सांगते.
View this post on Instagram
नुपूरने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री ‘अगले जनम मोहे बिटिया ही किजो’, ‘घर की लक्ष्मी बेटियां’, ‘दिया और बाती हम’ आणि ‘शक्तिमान’ सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. याशिवाय ती ‘क्यूंकी मैं झुठ नहीं बोलता’ सारख्या चित्रपटांचाही भाग होती.