मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची युवासेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत शिंदे गटातील मंत्र्यांच्या मुलांना संधी देण्यात आली आहे. मंत्री दादा भुसे, आमदार सदा सरवणकर, अर्जुन खोतकर, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलांना संधी देण्यात आलीय. शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी या कार्यकारिणीबाबत माहिती दिली आहे.
शिंदे गटातील प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युवा सेना कार्यकारिणीमध्ये उत्तर महाराष्ट्रातून अविष्कार भुसे, मराठवाड्यासाठी अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील, कोकणातून विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे, पश्चिम महाराष्ट्रात किरण साली, सचिन बांगर, कल्याण भिवंडीत दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक, ठाणे, नवी मुंबई व पालघर मध्ये नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे, मुंबईतून समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे तर विदर्भात ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील यांना युवासेना कार्याकारिणीत संधी देण्यात आली आहे.