Team India : दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आलेला आहे. दोन्ही संघांमध्ये ( IND vs SA T20) ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी तिरुअनंतपुरम येथे खेळला गेला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ( Team India ) ८ गडी राखून सामना जिंकला होता. मालिकेतील दुसरा सामना २ ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथील बार्सपारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
भारतीय संघ ( Team India ) सध्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात भारताला मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे. दोन्ही संघ ( IND vs SA T20) गुवाहाटीला पोहोचले असून बीसीसीआयने याबाबत अधिकृत ट्विटर खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बारदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन्ही संघांच्या खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. भारतीय क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी अनेक क्रिकेट चाहत्यांनी विमानतळ आणि हॉटेलबाहेर गर्दी केल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे विमानतळावर दोन्ही संघांच्या खेळाडूंचे पारंपरिक शैलीत स्वागत करण्यात आले. दोन्ही संघातील खेळाडूंचे आसामी गमचा देऊन स्वागत केले गेले. ( IND vs SA T20i Grand welcome for Team India and South Africa teams in Guwahati )
Thiruvananthapuram ✅
Hello Guwahati 👋#TeamIndia | #INDvSA | @mastercardindia pic.twitter.com/QQU2cdVxF5
— BCCI (@BCCI) September 30, 2022
दुसऱ्या सामन्यासाठी गुवाहाटी येथील खेळपट्टी फलंदाजांना साथ देण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणे सहज शक्य आहे. कारण सामन्याच्या दुसऱ्या डावात खेळपट्टी फलंदाजांना जास्त साथ देते. त्यामुळे याठिकाणी गोलंदाजांना चांगलेच तगडे आव्हान असणार आहे.