नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी नवी दिल्ली येथे माजी खासदार @YuvrajSambhaji यांची सदिच्छा भेट घेतली.संभाजीराजे यांनी छत्रपती #शिवाजीमहाराज यांची प्रतिमा व छत्रपती #शाहूमहाराज यांच्या जीवन कार्यावरील पुस्तक मुख्यमंत्र्यांना भेट दिले. यावेळी शिक्षणमंत्री @dvkesarkar उपस्थित होते. pic.twitter.com/fmvLPHjtw4
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 22, 2022
यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावरील पुस्तक मुख्यमंत्री शिंदे यांना भेट दिले. यावेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, हेमंत पाटील आणि माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यावेळी उपस्थित होते.