वॉशिंग्टन – पार्टी कल्चर हा पाश्चिमात्य संस्कृतीचा भाग असला तरी आता अमेरिकेत वाढते मद्यपान ही डोकेदुखी बनू पाहात आहे एका ताज्या आकडेवारीप्रमाणे मद्यपानामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये तब्बल 25 टक्के वाढ झाली असून मद्यावरील करांमध्ये मोठी वाढ करण्याची आग्रही मागणी नागरिकांकडून केली जात आहे या आकडेवारी प्रमाणे 2019 मध्ये मद्यपानामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 78927 होती 2020 मध्ये हा आकडा 99017 पर्यंत पोहोचला म्हणजेच मृत्यूच्या संख्येमध्ये तब्बल 25 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले.
या परिस्थितीची दुसरी बाजू अशी आहे की 2021 मध्ये अमेरिकेच्या तिजोरीत तब्बल आठ टक्क्यांची वाढ झाली आहे म्हणजेच मद्याच्या माध्यमातून जे उत्पन्न सरकारला मिळते त्यात गेल्या दोन वर्षांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे अमेरिकेतील प्रत्येक राज्यामध्ये कराचे दर भिन्न असल्याने ज्या राज्यांमध्ये मद्यावरील कर कमी आहेत त्या ठिकाणी मद्यामुळे होणारे मृत्युचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे.
यासाठी ओरेगोन या राज्याचे उदाहरण देण्यात येते ज्या ठिकाणी अडीच हजार पेक्षा जास्त लोक मद्यामुळे मृत्युमुखी पडले आहेत या राज्यामध्ये मद्यावर सर्वात कमी म्हणजे तीन टक्के कर आकारला जातो अल्कोहोल अँड ड्रग कमिशन पॉलिसीचे निर्देशक रेजिनाल्ड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मद्यावरील करांमध्ये वाढ केली तर मद्याच्या मागणीमध्ये कपात होते हे आजवर सिद्ध झाले आहे त्यामुळे जर अमेरिकेतील मद्यामुळे होणारे मृत्यू कमी करायचे असतील तर हे कर वाढवणे हेच महत्त्वाचे आहे अमेरिकेत मद्यविषयक एक ठोस असे धोरण तयार करून ते ठामपणे राबवण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे