मुंबई – सैफ अली खान आणि करिना कपूर यांची मुलं तैमूर आणि जहांगीर (जेह) सोशल मीडियावर खूपच हिट आहेत. सुरुवातीला ज्याप्रमाणे छोट्या तैमूरचे फोटो प्रचंड व्हायरल व्हायचे अगदी त्याप्रमाणेच जहांगीरचे देखील आता फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तसेच सोशल मीडियावर नेटकरी दोघांच्या फोटोंचे कंप्यारिजन देखील करताना दिसत आहेत.
तैमूर आता मीडियासमोर फोटोसाठी तितका उत्साही वाटत नाही. लहानपणी कॅमेऱ्याचे आकर्षण असलेल्या तैमूरला आता सवय झाली आहे. मात्र त्याचा भाऊ जहांगीर कॅमेऱ्यासमोर चांगल्याच पोज देताना दिसतो. म्हणूनच त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. जेह त्याच्या वांद्रे येथील घरात जात होता. तेव्हा तेथे पापाराझी फोटोंसाठी आधीच उपस्थित होते. अशा स्थितीत जेह त्यांना पाहून उत्साहित झाला आणि त्यांच्याकडे जाऊ लागला. यावर न्यानीने त्याचा हात पकडला असता तो हात सोडून पळून जाऊन जमिनीवर बसला. त्यानंतर ०न्यानीने त्याला उचलून घरात नेले.
View this post on Instagram
जेहचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच चाहत्यांना बोलण्याची संधी मिळाली. अनेक युजर्सना जेहची ही स्टाईल क्यूट वाटली. काही वापरकर्त्यांनी सांगितले की जेह मीडिया फ्रेंडली आहे आणि त्याला मुलाखत द्यायची आहे. त्याच वेळी, काही वापरकर्त्यांनी असेही म्हटले की त्याला देखील त्याची आई करीना कपूरप्रमाणे लक्ष वेधून घ्यायचे आहे.