जोहान्सबर्ग : पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या टी२० लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जसह अनेक भारतीय फ्रँचायझींनी संघ खरेदी केले आहेत. आता या स्पर्धेसाठी सर्व संघांनी आपापली रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे.
चेन्नई सुपर किंग्सने आपला माजी सलामीवीर फाफ डु प्लेसिसकडे दक्षिण आफ्रिकन लीगमध्ये जोहान्सबर्ग सुपर किंग्जचे नेतृत्व सोपवले आहे. एका वेबसाइटच्या अहवालानुसार, फाफ डु प्लेसिस हा पाच खेळाडूंपैकी एक आहे ज्याला जोहान्सबर्ग संघासाठी सुमारे 3 कोटी रुपये मध्ये थेट करारबद्ध केले आहे. त्याचवेळी मोईन अलीला सुमारे 3 कोटी १७ लाख रुपयांमध्ये करारबद्ध केले आहे.
या खेळाडूंशिवाय जोहान्सबर्गच्या कोचिंग स्टाफमधील जुन्या लोकांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. स्टीफन फ्लेमिंग हे संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील, तर एरिक सिमन्स त्यांचे सहाय्यक म्हणून काम पाहतील. अहवालानुसार, फ्रँचायझी दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू अॅल्बी मॉर्केलला कोचिंग स्टाफशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. २००८ ते २०१३ या काळात मॉर्केल चेन्नई सुपर किंग्जशी खेळाडू म्हणून संबंधित होता. २०१० आणि २०१ मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या संघाचाही तो भाग होता.