ठाणे – ठाणे शहरातील तलावपाली भागात शिवसेना जिल्हा शाखेत स्वातंत्र्यदिनानिमित्त रात्री ध्वजावंदन करण्याची परंपरा आहे. आनंद दिघे हे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी ही परंपरा सुरु केली होती. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील ही परंपरा सुरु ठेवल्याचे पाहायला मिळाले. रात्री बरोबर १२ वाजून १ मिनिटांनी या ठिकाणी शिंदे यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले.
Maharashtra CM Eknath Shinde attends a flag-hoisting ceremony at midnight in Thane city, on the occasion of Independence day pic.twitter.com/wr0zD905fr
— ANI (@ANI) August 14, 2022
या कार्यक्रमासाठी शिंदे गटातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यासोबतच ठाकरे गटातील खासदार राजन विचारे यांना पोलिसांनी नोटीस देऊनही त्यांनी या ठिकाणी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. काही काळासाठी दोन्हीही गटातील समर्थक एकमेकांसमोर आल्याने तणाव झाल्याचे पाहायला मिळाले. चोख बंदोबस्त असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाणे शहरात सुरू केलेल्या परंपरेनुसार ठाणे शहर मध्यवर्ती शिवसेना शाखेच्या प्रांगणात दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्यरात्री ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न#स्वातंत्र्यदिन #IndiaAt75 #AzadiKaAmritMahotsav pic.twitter.com/xnwXLlncwc
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 14, 2022
कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात,”भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाणे शहरात सुरू केलेल्या परंपरेनुसार ठाणे शहर मध्यवर्ती शिवसेना शाखेच्या प्रांगणात दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्यरात्री ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न”