नवी दिल्ली – कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना दुसऱ्यांदा करोना संसर्ग झाला. त्यानंतर खबरदारी बाळगत प्रियंका यांचे बंधू आणि कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारचा राजस्थान दौरा रद्द केला. करोनाबाधा झाल्याची माहिती स्वत: प्रियंका यांनी ट्विटरवरून दिली. आता त्या काही दिवस घरातच विलगीकरणात राहणार आहेत.
याआधी मागील वर्षी जूनमध्ये प्रियंका यांना करोनाचा संसर्ग झाला होता. प्रियंका आणि कॉंग्रेसच्या इतर काही नेत्यांनाही करोनाबाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राहुल स्वत:ची करोनाविषयक चाचणी करून घेणार आहेत. त्यांच्या आई आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी काही दिवसांपूर्वीच करोना संसर्गातून बऱ्या झाल्या.