मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 जूनला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. आणि आज (दि.9) म्हणजेच तब्बल 39 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. यावेळी शिंदे गटातील 9 तर भाजपकडून 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सगळ्यामध्ये विशेष आहे ते 9 हा अंक.
एकनाथ शिंदे आणि 9 अंक यांचा अनेकदा संबंध आल्याचे दिसून आले आहे. शिंदे यांची जन्म तारीख 9 फेब्रूवारी 1964 आहे. त्यांचा जन्म दिनांक 9 असा आहे. तसेच त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात देखील 9-9 अस प्रमाण ठरलं. यावरून आता एकनाथ शिंदे आणि 9 अंक यामध्ये काहीतरी गुपित असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान आज शिंदे गटाकडून मंत्रिमंडळ विस्तारातील पहिल्या टप्प्यात शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, दीपक केसरकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, दादा भुसे, उदय सामंत, संजय राठोड यांना संधी देण्यात आली आहे.
तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे, विजयकुमार गावित यांना संधी देण्यात आली आहे.