मुंबई – रितेश जेनिलियाची जोडी अख्या बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. दोघांमधील प्रेम असो कि भांडण याच्या चर्चा संपूर्ण सिनेसृष्टीत होतात. दोघेही आपल्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. जेव्हाही दोघे सोबत येतात तेव्हा सोशल मीडियावर काहीना काही पोस्ट करतातच. चाहते देखील त्यांच्या पोस्टला भरभरून प्रतिसाद देत असतात. नुकतंच रितेशने जेनिलियाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
रितेशने इंस्टाग्रामवर एक रील पोस्ट केली आहे. ज्यात त्याने जिनिलियाच्या नकळत काढलेला व्हिडीओ टाकलाय. या व्हिडिओची गमंत म्हणजे रितेशने व्हिडीओ काढताना एक फिल्टर वापरला आहे. यामुळे जेनिलियाला चक्क मिशी आलेली दिसते. जिनिलियाच्या नकळत काढलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चा विषय ठरत आहे.
View this post on Instagram
मिशी असलेल्या जेनिलियाचा व्हिडीओ टाकत रितेशने ‘माझा नवरा; असे कॅप्शन देत इंस्टाग्रामवर जणू लाफ्टर बॉम्ब फोडलाय. रितेशचा इंस्टावरील आतापर्यंतचा हा सर्वात फनी व्हिडीओ असल्याचं अनेक चाहते कमेंटमध्ये म्हणत आहेत. जेनेलियाने देखील रितेशला संतापजनक रिप्लाय देत “नाऊ यु आर इन ट्रबल” अशी कमेंट केली आहे.