पिंपरी, दि. 3 (प्रतिनिधी) -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 15 ऑगस्टला “हर घर तिरंगा’ या उपक्रमाची घोषणा केली. या उपक्रमाच्या तयारीसाठी मंगळवारी (दि. 2) चिंचवड विधानसभेतील भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची बैठक झाली. आपल्या प्रभागात झेंडे लावण्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळे टार्गेट देण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने तिरंगा झेड्यासाठी निविदा काढल्या असून शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयात तिरंगा ध्वज विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. पंतप्रधानाचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपनेही कंबर कसली आहे. चिंचवड विधानसभा क्षेत्रातील भाजपच्या प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची विशेष बैठक बोलविण्यात आली होती, त्यात टार्गेट देण्यात आले आहे.