कात्रज, दि. 3 (प्रतिनिधी) – अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे आयोजित पुणे शहर व जिल्हा बचत गट स्पर्धा 2022 स्पर्धे मध्ये कात्रज -कोंढवा रोड येथील माहूरगड महिला बचत गटाला उत्कृष्ट बचत गट म्हणून पुरस्कार मिळाला आहे. 200 बचत गट या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते.
या स्पर्धेसाठी बचत गटाच्या अध्यक्ष अश्विनी अनिल कदम, उपाध्यक्ष शैलाजा राऊत, खजिनदार गौरी वाघमारे, तेजस्विनी कदम सारिका घाटे,वैशाली कस्तुरकर, शामशाद पटेल व सर्व सभासद यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. बचत गटाच्या समूह संघटिका शितल सुरवसे यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले. बचत गटाला मिळालेल्या पुरस्कारा बद्दल परिसतून कौतुक होत आहे.