मुंबई – बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान आपल्या अनोख्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे.मग कधी तो बिंग ह्युमनचा शर्ट घातला म्हणून चर्चेत असतो तर कधी फार्म हाऊसवर पार्टी केली म्हणून चर्चेत असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून सलमान सुरक्षेच्या मुद्द्यावरून चर्चेत आला होता. म्हणूनच सलमानने पोलिसांकडे बंदूक परवान्याची मागणी केली होती.
धमकी मिळाल्यानंतर सलमान आपल्या कुटुंबाची पूर्णपणे काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय. मिळालेल्या माहितीनुसार एका विमान तळावरून जाताना सलमान आपल्या नवीन ताफ्यासोबत दिसून आला. यावेळी सलमान आपल्या नेहमीच्या गाडीतून न आल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. सलमान ज्या गटातून आला ती गाडी नवीन लँड क्रुझर असल्याचे बोलले जात आहे. दीड कोटी रुपये किंमत असलेली ही गाडी बुलेटप्रूफसह अत्यावश्यक सुविधा देणारी आहे.
View this post on Instagram
सलमानचा विमानतळावर नव्या गाडीसह आलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. यावेळी सलमानसोबत असलेला सुरक्षा रक्षकांचा गराडा देखील नेहमीपेक्षा अधिक वाटत आहे. काही दिवसांपूर्वी सलमानच्या परिवाराला आलेल्या धमकीनंतर सोशल मीडियावर सलमानच्या सुरक्षेबाबत अनेकांनी तर्क वितर्क व्यक्त केले होते.