मुंबई – अल्लू अर्जुन साऊथसह संपूर्ण देशात ‘स्टायलिश स्टार’ म्हणून प्रसिद्ध आहे. पुष्पाच्या यशानंतर अल्लूचे फॅन्स दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. अभिनयासोबतच लोक त्याच्या स्वॅग आणि डान्स मूव्ह्सचेही वेडे आहेत. ब्लॉकबस्टर ‘पुष्पा: द राइज’ नंतर, तो देशभरात एक डॅशिंग सुपरस्टार बनला आहे आणि आता लोक त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.
अल्लू अर्जुनचे लाखो चाहते त्याच्या आगामी ‘पुष्पा: द रुल’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, पुष्पा 2 स्टार बद्दल एक नवीन अपडेट आले असून आणि पुष्पराजने त्याबद्दल माहिती दिली आहे.अल्लू अर्जुनने त्याच्या सोशल अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो सिगार ओढताना दिसत आहे. फोटोमध्ये अभिनेता लेदर जॅकेट आणि चष्मा असलेला रंगीबेरंगी शर्ट घातलेला दिसत आहे.
या फोटोमध्ये तो पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसत असून लाखो चाहते त्यावर कमेंट करत आहेत. 12 तासांपूर्वी शेअर केलेल्या या फोटोला आतापर्यंत 2 मिलियन पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी तर हा फोटो शेअर करत पुष्पा २ मधील लूक असल्याचे म्हंटले आहे. सिगरेट स्मोकिंग इज इंज्युरीअस टू हेल्थ असं कॅप्शन देत अल्लू अर्जुनणे हा फोटो शेअर केला आहे.