मुंबई – 2020 मध्ये, चित्रपटसृष्टीने एक चमकणारा स्टार सुशांत सिंग राजपूत गमावला. सुशांत डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगण्यात आले. यामुळे त्याने आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक चाहत्यांनी बॉलीवूडवर निशाणा साधला कधी करण जोहरला बॉयकॉट करण्यात आले तर कधी स्टार किड्सला बॉयकॉट करण्यात आले. सुशांतच्या मृत्यूला 2 वर्षा पूर्ण झाले आहे. तरी सुद्धा हे चक्र सुरूच आहे.
ट्रोलिंग फ्लिपकार्ट
अशातच ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर उपस्थित असलेल्या टी-शर्टमुळे सुशांतच्या चाहत्यांचा पारा चढला आहे. तुम्ही म्हणाल की,’टी-शर्ट आहे, त्यावर एवढा राग का? आणि सुशांतचा काय संबंध? मुद्दा असा आहे की हा सामान्य टी-शर्ट नाही. टी-शर्टवर सुशांत सिंग राजपूतचा फोटो छापण्यात आला आहे.’ त्याहून धक्कादायक म्हणजे त्यावर लिहिलेले कोटेशन. सुशांतचा फोटो असलेल्या टी-शर्टवर कॅप्शन लिहिले आहे,’Depression is like Drowing’ हा टी-शर्ट फ्लिपकार्टवर 179 रुपयांच्या डिस्काउंटनंतर विकला जात आहे. त्याची किंमत 1099 सांगितली आहे.
दिवंगत अभिनेता सुशांतचा फोटो असलेला हा टी-शर्ट विकल्याबद्दल फ्लिपकार्टवर लोक संतापले आहेत. ट्विटरवर फ्लिपकार्टवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. सुशांतचे नाव डिप्रेशनशी जोडले गेल्याचे पाहून लोक संतापले आहेत. लोक म्हणतात की,’सुशांतची हत्या नैराश्याने नाही तर बॉलीवूडच्या माफियांनी केली आहे. एका वापरकर्त्याने फ्लिपकार्टला दिशाभूल करणारा टी-शर्ट विकल्याबद्दल नोटीस पाठवण्यास सांगितले आहे.’