बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या बोल्ड अभिनयाने लोकांची मने जिंकली. त्यापैकीच एक म्हणजे उदिता गोस्वामी. या अभिनेत्रीने इमरान हाश्मीसोबत खूप बोल्ड सीन्स दिले होते, पण तिने लवकरच चित्रपटांमधून निवृत्ती घेतली. उदिता आता खऱ्या आयुष्यात खूप बदलली आहे. अभिनेत्रीचा फोटो पाहून लोकांचा विश्वास बसत नाही की हीच उदिता गोस्वामी आहे जी पूर्वी आपल्या बोल्ड सीन्सने लोकांना घायाळ करत होती. तिचे अनेक चित्रपट आजही लोकांना पाहायला आवडतात.
उदिताची इमरानसोबतची जोडी खूपच गाजली
उदिता गोस्वामीने फार कमी चित्रपटात काम केले, पण ती चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली. उदिता गोस्वामीने इमरान हाश्मीसोबत ‘जेहेर’ आणि ‘अक्सर’ सारख्या चित्रपटात काम केलं आहे. तिने जॉन अब्राहमसोबत ‘पाप’ चित्रपटातही बोल्ड भूमिका साकारली होती. तिची चाहत्यांना चित्रपटातील जॉनसोबतची केमिस्ट्रीही खूप आवडली होती. मात्र उदिताने लवकरच लग्न केले आणि फिल्मी जग सोडले.
उदिताने दिग्दर्शक मोहितशी केलं लग्न
डेहराडूनमध्ये जन्मलेली उदिता गोस्वामी अभिनेत्री असण्यासोबतच एक मॉडेल देखील आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तिचे वडील बनारसचे आहेत आणि आई शिलाँगची आहे. उदिताने भलेही अभिनेत्यासोबत चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका केल्या असतील, पण खऱ्या आयुष्यात तिच्या अफेअरची चर्चा दिग्दर्शक मोहित सूरीसोबत सुरू झाली. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर तिने २०१३ मध्ये मोहितसोबत लग्न केले. मोहित आणि उदिता यांना दोन मुलेही आहेत.
उदिता गोस्वामीचे भट्ट कुटुंबाशी देखील नाते आहे. उदिता ही आलिया भटची नात्याने वहिनी आहे आणि इमरान हाश्मी नात्याने तिचा दीर आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 2014 मध्ये उदिता तिचा पती मोहित सूरीचे कथित कॉल डिटेल्स मिळवल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. या प्रकरणावरून बराच वाद झाला होता. पण या घटनेचा उदिता आणि मोहितच्या नात्यावर काहीही परिणाम झाला नाही. सध्या उदिता कुटुंबासोबत चांगले आयुष्य घालवत आहे.