रॉटरडॅम – एफआयएचप्रो लीग हॉकी स्पर्धेत रविवारी भारतीय पुरुष हॉकी संघाला नेदरलॅंड्सकडून 2-1 असा पराभव पत्करावा लागला. या विजयाच्या जोरावर नेदरलॅंड्सने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भारताला मात्र तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
भारताचा पहिल्या सामन्यात शूट-आऊटमध्ये 4-1 असा पराभव झाला होता. त्यामुळे विजेतेपदाची संधी कायम राखण्यासाठी भारताला रविवारची लढत जिंकावी लागणार होती. मात्र, पराभव झाल्यामुळे भारतीय संघाचे स्वप्न भंगले.
नेदरलॅंड्सने 14 सामन्यांत 35 गुण नोंदवत विजेतेपद मिळवले. त्यांचे दोन सामने अजूनही बाकी आहेत. ऑलिम्पिक विजेता बेल्जियमचा संघ 16 सामन्यांत 35 गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला. तर, भारताचे 16 सामन्यांत 30 गुण आहेत.