नवी दिल्ली : बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच के के चे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्याचे निधन झाले. तो ५४ वर्षांचा होता. केके यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
KK dies at 53: A look back at the musical journey of Bollywood’s most versatile singer
Read @ANI Story | https://t.co/h2wk06hmtp#KK #SingerKKDeath #SingerKK pic.twitter.com/EWh2uYA45v
— ANI Digital (@ani_digital) June 1, 2022
केके कोलकात्यामधील गुरुदास कॉलेजमधील नाझरुल मंचच्या कार्यक्रमामध्ये गात असतानच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो त्याच्या हॉटेल रुममध्ये परतला. मात्र त्याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला कोलकात्यामधील सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याचे सांगितले जात आहे.
Saddened by the untimely demise of noted singer Krishnakumar Kunnath popularly known as KK. His songs reflected a wide range of emotions as struck a chord with people of all age groups. We will always remember him through his songs. Condolences to his family and fans. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) May 31, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केकेच्या मृत्यूच्या बातमीनंतर ट्विटरवरुन खेद व्यक्त केला आहे . बुधवारी सकाळी त्याची पत्नी आणि मुलं कोलकात्यामध्ये दाखल होणार आहेत. मागील दोन दिवसांत केकेने कोलकात्यात दोन कॉन्सर्ट केले होते.